Saturday, January 21, 2012

विमा योजना घेण्यापूर्वी...

आथिर्क वर्ष संपायला आले असल्याने कर वाचवण्यासाठी विमा योजना घेण्याचा आग्रह करणारे अनेक कॉल येऊ लागले असतील. पण या गाजरांना भुलण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतलेली बरी. विमा सल्लागार सांगतो म्हणून एखादी योजना घेऊन पश्चात्ताप करण्यापेक्षा पुढील सोपे नियम पाळून अचूक निर्णय घ्यावेत:

> आयुष्यातील टप्प्यानुसार नियोजन

अन्य आथिर्क उत्पादनांप्रमाणेच विमा योजना निवडतानाही वय, अवलंबून असलेल्या व्यक्ती, अल्प व दीर्घकालून ध्येय्य हे घटक महत्त्वाचे ठरतात. अविवाहित असलेल्या आणि अन्य व्यक्ती अवलंबून नसलेल्यांनी टर्म पॉलिसी घ्यावी. लग्न व मुले झाल्यावर चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन घ्यावा. त्याचबरोबर पेन्शन प्लॅनही घेऊन ठेवावा.

> संरक्षण कवच

अनेकदा अपघाती मृत्यू आणि अपंगत्व हे कव्हर विमा योजनेसोबत रायडर म्हणून दिले जाते. योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना आथिर्क संरक्षण मिळण्यासाठी हे कव्हर महत्त्वाचे असते. हे कव्हर स्वतंत्र योजना म्हणूनही उपलब्ध आहेत.

> हेल्थ कव्हर

तरुण वयात योजना घेतल्यास सर्व आजारांबाबत संरक्षण मिळण्याची शक्यता वाढते. कौटुंबिक जबाबादारी असलेल्यांनी फॅमिली फ्लोटर पर्यायाचा विचार करावा. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत योजनेची रक्कम आहे की नाही, याची वेळोवेळी खात्री करावी.

> ठळक वैशिष्ट्यांची तुलना करावी

हेल्थ योजना घेण्यापूर्वी उपलब्ध उत्पादनांची इत्थंभूत माहिती घ्यावी आणि त्यांची तुलना करावी. नूतनीकरण, समाविष्ट नसलेल्या गोष्टी, वेटिंग पिरिएड या बाबी तपासाव्यात.


> नव्या योजनांचा विचार करावा

पूवीर्चे चित्र आता बदलले असून हेल्थ प्लॅनमध्ये कमालीचे वैविध्य आले आहे. यंदा हेल्थ प्लॅन घेताना नव्याने आलेल्या योजनाही विचारात घ्यायला हरकत नाही. या योजना संपूर्ण कुटुंबाला विम्याचे कवच, आयुष्यभर नूतनीकरण, आदी सुविधा देणाऱ्या असाव्यात.

काय टाळावे?

> आयत्या वेळची विमाखरेदी टाळावी

केवळ कर वाचवण्यासाठी विमा योजना घेऊ नये. या योजनेसाठी अनेक वषेर् हप्ता भरावा लागणार आहे, हे लक्षात ठेवावे. हप्ते चुकले तर नुकसान सोसावे लागू नये. केवळ मित्र, बॉस, नातेवाईक सांगतात म्हणून विशिष्ट योजना घेऊ नये. योजना दीर्घकाळासाठी असल्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

युलिप आणि पेन्शन युलिप योजनाही लोकप्रिय असल्याने त्या विचारात घ्याव्यात. संपत्ती साठवण्यासाठी योजना घ्यायची असेल तर इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ईएलएसएस), डायव्हसिर्फाइड इक्विटी फंड आणि बॅलन्स्ड फंड हे पर्याय आहेत.

> माहिती लपवू नका

लाइफ पॉलिसी आणि हेल्थ पॉलिसीमध्ये विम्याचा दावा नाकारला जाण्याचे एक कारण असते म्हणजे अपुरी माहिती. अनेकदा एजंटला संपूर्ण माहिती दिली जात नाही. एजंटला योजनाधारकांच्या आरोग्याबाबत कल्पना नसते. त्यामुळे ही माहिती स्वत:च भरायला हवी. चुकीची माहिती देऊन किंवा काही तपशील दडवून विमा योजना खरेदी करू नका. त्याचा परिणाम दाव्यावर होऊ शकतो.

> नूतनीकरण चुकवू नका

साधारणत: जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या इंडेम्निटी-आधारित हेल्थ प्लॅनचे दरवषीर् नूतनीकरण करावे लागते. ते विसरू नये. नूतनीकरण केलेल्या योजनेची वैशिष्ट्ये पूवीर्च्या योजनेसारखीच असतील, असे समजू नये. विमा कंपन्या त्यात बदल करू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नूतनीकरण करताना योजनेतील नियम व अटी तपासून घ्याव्यात.

'केवायसी'ची प्रक्रिया आता एकदाच

भांडवली बाजारातील विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी निरनिराळ्या प्रकारे सादर कराव्या लागणाऱ्या 'नो युवर कस्टमर' (केवायसी) प्रक्रियांचा खटाटोप आता वाचणार आहे. विविध प्रकारच्या आथिर्क व्यवहारांसाठी एकदाच 'केवायसी' प्रक्रिया करण्यास मंजुरी देऊन भांडवल बाजार नियंत्रक 'सेबी'ने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. तसेच, 'केवायसी'साठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्डाचा (यूआयडी) समावेश करण्यासही 'सेबी'ने मान्यता दिली आहे.

स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजर आदींना 'केवायसी' द्यावे लागते. प्रत्येकासाठी 'केवायसी'ची स्वतंत्रपणे प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने वेळेचा अपव्यय होतो, कामाची पुनरावृत्ती होते, तसेच यामुळे विनाकारण नोंदी वाढतात. 'सेबी'च्या नव्या निर्णयामुळे या अडचणी दूर होणार आहेतच. 'सेबी' 'केवायसी' रेग्युलेशन अॅथॉरिटी स्थापन करणार आहे. यामुळे भांडवल बाजारातील विविध विभागांना जोडण्यासाठी मदत होईल.

सर्व प्रक्रियांसाठी एकदाच 'केवायसी' प्रक्रिया केल्याची खात्री करण्यासाठी 'सेबी'ने एक यंत्रणा सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, भांडवल बाजारातील व्यवहार करण्यासाठी खाते उघडताना 'केवायसी'ची प्रक्रिया 'केवायसी' रजिस्ट्रेशन एजन्सीकडून (केआरए) पूर्ण केली जाईल. स्टॉक ब्रोकर किंवा म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांसाठी एकदाच 'केवायसी' प्रक्रिया करून घेतील आणि हा तपशील 'केवायसी' रजिस्ट्रेशन एजन्सीच्या यंत्रणेत समाविष्ट करतील. तिथून गुंतवणूकदारांनी अन्यत्र आथिर्क व्यवहार करायचे ठरवल्यास हा तपशील 'केआरए'कडून घ्यावा लागेल. तपशीलात काही बदल असल्यास - जसे पत्ता, नाव - 'केआरए'कडे कळवल्यास संबंधित गुंतवणूकदाराच्या माहितीत बदल केले जातील. ही प्रक्रिया एकदाच करावी लागेल.

' केआरए' यंत्रणेचे फायदे
> भांडवल बाजारातील सर्व व्यवहारांसाठी एकच 'केवायसी'
> वेळेत बचत
> गुंतवणूकदारांना पुन्हा पुन्हा 'केवायसी' प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही