चेकने व्यवहार करताना..
- चेक नाकारल्यानंतर बँकेने तुम्हाला कळवणे आणि चेक नाकारण्याची कारणे देणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेने नाकारलेला चेक २४ तासांच्या आत संबंधित खातेदाराला पाठवणे आणि तो नाकारण्याचे कारण स्पष्ट करणे बंधनकारक असते.
- चेक हरवल्यास ती जबाबदारी खातेदाराची नाही, तर तो स्वीकारणार्या बँकेची असते. चेक वेळेत क्रेडिट झाला नाही तर तुम्हाला बँकेला स्टॉप पेमेंटची सूचना द्यावी लागते. यासाठी प्रत्येक बँकेनुसार ५0 ते २00 रुपये शुल्क आकारले जाते.
- तुमच्याकडे चेक बँकेत जमा केल्याचा पुरावा असेल आणि बँकेच्या हलगर्जीपणामुळे चेक गहाळ झालेला असेल तर तुम्ही बँकेकडे पैसे मागू शकता . रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार , डुप्लिकेट चेक मिळविण्यासाठी येणार्या खर्चाची भरपाई बँकेने खातेदाराला द्यावी.
चेकच्या बाबतीत काय काळजी घ्यावी ? - चेकवर लिहिताना नाव , रक्कम , तारीख व्यवस्थित लिहा.
- स्पेलिंग चुकीचे लिहू नका .
- तसेच,अक्षरे स्पष्ट असावीत. लिहिलेल्यावर पुन्हा पुन्हा लिहू नका .
- चेक ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्याची सुविधा बँकांनी दिली असली तरी मोठय़ा रकमांच्या चेकच्या बाबतीत ते टाळलेले बरे. असे चेक बँकेत जाऊन भरावेत व त्याची पावती घेऊन ती सांभाळून ठेवावी .
- बँकेकडे चेक ट्रॅझेक्नशन सुविधा असल्यास तिचा जरुर लाभ घ्यावा . यामुळे चेक मशीनमध्ये टाकल्यावर त्याची फोटोकॉपी मिळते.
या गोष्टीत लक्षात ठेवा - चेक केवळ सहा महिने व्हॅलिड असतो. मात्र, १ एप्रिल २0१२ पासून तीन महिनेच वैध राहील.
- चेकवर योग्य वर्ष लिहिले असल्याची खात्री करून घ्या.
- बँकेत खाते उघडताना कोणती सही केली होती ते लक्षात ठेवा.
- चेक बाऊन्स झाला तर ७५ ते ३00 रुपये दंड भरावा लागतो
- चेक रद्द केला असेल तर एसआयसीआर नंबर खोडून टाका आणि कॅन्सल्ड असे लिहा . तुम्ही बँकेत भरलेला चेक बँकेकडून गहाळ होण्याचे किंवा बाकी पद्धतीने हरवण्याचे प्रकार काही वेळा होतात. अशा वेळी पुढील गोष्टी करता येतील.
|
No comments:
Post a Comment