■ म्युच्युअल फंडामध्ये विम्याचे संरक्षण मिळत नाही. ■ युलिपमध्ये विम्याचे संरक्षण मिळते. ■ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लिक्विड, डेट, बॅलन्स व ग्रोथ अशा चार स्वरूपाच्या फंडांत होते. ■ गुंतवणूकदाराला त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे फंडाची निवड करता येते. ■ युलिपमधील गुंतवणूकसुद्धा वरीलप्रमाणे चार फंडांत करण्यात येते. तसेच गुंतवणूक करताना फंड निवडण्याचे स्वातंत्र्य असते. ■ एका म्युच्युअल फंडाची योजना ही एकाच फंडाशी निगडीत असते. ■ युलिपमध्ये एकाच योजनेमध्ये चारही फंड उपलब्ध असतात. ■ त्यामुळे गुंतवणूकदाराला निरनिराळ्य़ा फंडांत पैसे गुंतविण्याची मुभा असते. ■ एका म्युच्युअल फंडातून आपले पैसे दुसर्या फंडात वळवायचे असल्यास त्या फंडातून बाहेर पडावे लागते व दुसर्या फंडाची योजना स्वीकारावी लागते. ■ ही पद्धत काहीशी खर्चिक असू शकते. ■ त्यासाठी एक्झिट लोड भरावा लागू शकतो. ■ युलिपमध्ये चारही फंड एकाच योजनेमध्ये उपलब्ध असल्यामुळे एका फंडातून दुसर्या फंडात पैसे सहज हस्तांतरित करता येतात. ■ याला स्वीच असे म्हणतात. ■ वर्षातून चार वेळा हे पैसे मोफत हस्तांतरित करता येतात. ■ म्युच्युअल फंडाची एसआयपी योजना युलिपमध्ये सुद्धा उपलब्ध असते. ■ म्युच्युअल फंडात ऑटोमॅटिक ट्रन्स्फर प्लॅनची योजना उपलब्ध नाही. ■ युलिपमध्ये ही योजना उपलब्ध आहे. ■ जे लोक एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. डेट फंडामध्ये गुंतवणूक करून दर महिन्याला ठराविक पद्धतीने पैसे ग्रोथ फंडात हस्तांतरित करता येतात. ■ यात एसआयपीसारखा फायदा मिळतो. ■ म्युच्युअल फंडामध्ये लाभांश व बोनस मिळण्याची सुविधा असते. ■ नवीन फंड असल्यास तीन वर्षे गुंतवणूक अनिवार्य असू शकते. ■ जुन्या खुल्या मुदतीच्या फंडांमध्ये केव्हाही पैसे काढण्याची मुभा असते. ■ युलिपमध्ये तीन किंवा पाच वर्षे गुंतवणूक अनिवार्य असते. ■ त्यानंतर गरजेप्रमाणे पैसे काढण्याची सोय उपलब्ध असते. ■ काही विमा कंपन्या ठराविक काळाने बोनस युनिट देतात. ■ बंद मुदतीच्या म्युच्युअल फंड योजनेत नंतर जास्त पैसे भरण्याची सोय उपलब्ध नसते. ■ युलिपमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ■ सर्वसाधारण म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर करसवलतीचा फायदा मिळत नाही. ■ म्युच्युअल फंडामध्ये मिळणार्या परताव्यावर चक्रवाढीचा संपूर्ण फायदा मिळत नाही. ■ हा फायदा युलिपमध्ये मिळतो. ■ म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. ■ म्युच्युअल फंडामध्ये प्रथम शुल्क बरेच कमी असते किंवा थेट गुंतवणूक केल्यास हे शुल्क लागत नाही. अनेक वेळा म्युच्युअल फंडाकडे वळताना गुंतवणूकतज्ज्ञ युलिपमध्येही गुंतवणुकीचा सल्ला देतात. परंतु गुंतवणुकीतून आपल्याला किती परतावा हवा आहे, गुंतवणुकीमागचा हेतू काय आहे याचा बारकाईने विचार करून मगच गुंतवणूक करणे इष्ट ठरते. म्युच्युअल फंड आणि युलिप या दोन्ही योजनांचे वरकरणी स्वरूप एकसारखेच आहे; पण तरीही त्या दोन्ही योजना वेगळ्य़ा आहेत. |
*Retirement Planning *Child Education Plan *Daughter's Marriage Fund *Estate Creation *Mobile:9322066623
Saturday, September 3, 2011
म्युच्युअल फंडापेक्षा युलिप अधिक फायदेशीर!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment