प्रश्न:
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (लाइफ इन्शुरन्स कॉपोर्रेशन-'एलआयसी') योजना खरेदी केली आणि या योजनेच्या 'ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेन्ट' मध्ये नाव चुकीचे लिहले गेले ('स्पेलिंग मिस्टेक') आहे. नावात एक अक्षर (अल्फाबेट) अतिरिक्त पडले आहे. ही चूक दुरुस्त केली गेली नाही तर तिचे परिणाम काय होतील? चूक दुरुस्त करून घेण्यासाठी मी काय केले पाहिजे?
उत्तर:
उत्तर:
पॉलिसीहोल्डरच्या नावातील अशी छोटी चूक विमा दावा पूतीर्च्या ('क्लेम सेटलमेन्ट') वेळी तसा आडवी येणार नाही. पण, 'पॉलिसी रेकॉर्ड्स'मध्ये ही चूक दुरुस्त केली नाही तर विमा कंपनीकडून तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सर्वच रकमांच्या धनादेशांवर ('पेमेण्ट इन्स्ट्रुमेन्ट्स') चुकीचे नाव छापले जाईल, मग तो 'सर्व्हाय्व्हल बेनिफिट'चा चेक असो 'क्लेम'चा. त्यामुळे तुमची बँक असे चेक स्वीकारणार आणि वटविणार नाही. म्हणून नावातील ही चूक तुम्ही 'एलआयसी'च्या निदर्शनास आणून दुरुस्त करवून घ्या. नावातील चूक दुरुस्त करवून घेण्यासाठी स्वत:च्या एका चांगल्या ('व्हॅलिड') फोटोसह एक अर्ज सादर करणे पुरेसे आहे.
No comments:
Post a Comment