■ क्रिटिकल इलनेस रायडर या सुरक्षिततेसाठी किंवा बचतीसाठी असलेल्या प्लॅनसोबत मिळणार्या रायडरमुळे तुम्हाला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले आणि त्यानंतर तुम्ही जिवंत राहिलात तर या रायडरखाली निवडलेल्या विमा रकमेइतकी राशी दिली जाते. ■ तुमची मूळ पॉलिसी कोणत्याही बदलाशिवाय पुढे चालू राहते. ■ हा रायडर वाढीव फायद्याच्या स्वरूपात किंवा जलद फायद्याच्या स्वरूपात असू शकतो. ■ जर रायडर जलद फायद्याच्या स्वरूपात असेल तर मूळयोजनेखालील फायदा त्वरेने म्हणजे गंभीर आजाराचे निदान झाल्यावर लगेच दिला जातो आणि मूळ योजनासुद्धा संपुष्टात येते. ■ याउलट रायडर वाढीव फायद्याच्या स्वरूपात असेल तर रायडर खालील विम्याची रक्कम निदान झाल्यावर देण्यात येते. आणि मूळ योजना पुढे चालू राहते. ■ क्रिटिकल इलनेस फायदा हा विमा योजनेचा अंगभूत भागही असू शकतो. ■ अपघाती मृत्यू फायदा या रायडरमध्ये जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर निवडलेली विम्याची रक्कम दिली जाते. ■ ही रक्कम मूळ योजनेखाली मिळणार्या विमा रकमेच्या अतिरिक्त असते. ■ या फायद्याच्या वाटपानंतर पॉलिसी करार संपुष्टात येतो. ■ पूर्ण व कायम अपंगत्व, प्रीमियम भरण्यापासून सूट आणि वाढीव अवधी फायदा या रायडर्समुळे जर विमाधारकाला अपंगत्व येऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या क्षमतेत कमालीची बाधा आली तर त्याच्या कुटुंबाला अधिक आर्थिक मदत मिळते. ■ प्रीमियम भरण्यापासून सूट या रायडरमध्ये विमाधारक जर अपंगत्वामुळे कोणताही व्यवसाय करण्यास असर्मथ ठरला तर मूळ प्रीमियम भरण्यापासून सूट मिळते. ■ पूर्ण व कायम अपंगत्व रायडरमध्ये जर विमाधारकास दुर्दैवाने पूर्ण व कायम अपंगत्व आले तर विमा रकमेचा काही भाग दरवर्षी १0 टक्के याप्रमाणे ठरावीक कालावधीसाठी योजनेस दिलेल्या शर्तीनुसार दिला जातो. ■ पूर्ण व कायम आणि अंशत: अपंगत्व फायदा हे रायडर्स ग्रूप अवधी विमा योजनांतर्गतसुद्धा दिले जातात. ■ वाढीव अवधी फायदा रायडरमध्ये रायडरच्या अवधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास एक विमा रक्कम अधिक दिली जाते. ■ हा फायदा मूळ फायद्यांच्या अतिरिक्त आहे, हा रायडर बहुतांश वेळा एन्डोमेंट आणि मनी बॅक या योजनांबरोबर जोडलेला असतो. आयुर्विमा योजनेबरोबर उपलब्ध असलेल्या रायडर्समुळे गरजांप्रमाणे व आवश्यकतेनुसार विमा प्लॅन बनविता येतो. यामुळे आपला प्लॅनही अधिक आकर्षक होऊ शकतो. रायडरसाठी द्यावा लागणारा अधिकचा प्रीमियम हा तुलनेने मूळ प्लॅनपेक्षा कमी असतो. रायडर स्वतंत्रपणे घेता येत नाहीत, तर मूळ प्लॅनबरोबर मिळणारे पर्याय निवडून अधिक फायद्याच्या स्वरूपात घेता येतात. |
*Retirement Planning *Child Education Plan *Daughter's Marriage Fund *Estate Creation *Mobile:9322066623
Sunday, September 4, 2011
विमा रायडर्सविषयी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment