सर्व कागदपत्रे तयार असतील तर हेल्थ इन्शुरन्सचे दावे
करताना तितक्या अडचणी येणार नाहीत . हे दावे सहज व सुरळीत होण्यासाठी पुढील गोष्टी पाळाव्यात .
....
रिइम्बर्समेंट क्लेम
- हॉस्पिटलात भरती होण्यापूर्वी ' टीपीए ' किंवा विमा कंपनीला कळवावे . अचानक हॉस्पिटलात न्यावे लागल्यास अशा आणीबाणीच्या वेळी भरती झाल्यापासून २४ तासांच्या आत कळवावे .
- सर्व औषधांची व संबंधित खर्चाची प्रिस्क्रिप्शन , बिले व पेमेंट रिसिट जपून ठेवाव्यात .
- बिले व रिसिटवर अचूक नाव व पत्ता असल्याची खात्री करून घ्यावी .
- हॉस्पिटलातून घरी जाताना डिस्चार्ज कार्ड आठवणीने घ्यावे .
- सर्व प्रिस्क्रिप्शन , बिले व डिस्चार्ज कार्डाची फोटोकॉपी जवळ ठेवावी .
- पुढचे उपचार घरी सुरू ठेवायचे असतील तर डिस्चार्ज घेताना डॉक्टरांकडून तसे नमूद करून घ्यावे .
- विम्याच्या दाव्यासाठीचा अर्ज भरून सोबत बिले , डिस्चार्ज कार्डाची मूळ प्रत व अन्य कागदपत्रे जोडावीत.
- विम्याच्या दाव्यासाठीचा अर्ज प्रत्यक्ष जाऊन सादर करताना शिक्का मारलेली पावती आठवणीने घ्यावी .
....
कॅशलेस क्लेम
अचानक हॉस्पिटलात भरती करणे
- हॉस्पिटलात भरती होताना विमा कंपनीने वा ' टीपीए ' ने दिलेले ओळखपत्र दाखवावे .
- हॉस्पिटलात भरती झाल्यापासून २४ तासांच्या आत ' टीपीए ' किंवा विमा कंपनीला फोन करून किंवा ईमेलद्वारे कळवावे . ' क्लेम इंटिमेशन नंबर ' मिळाल्याची खात्री करून घ्यावी
- ऑथरायझेशन फॉर्म भरून ' टीपीए ' किंवा विमा कंपनीकडे पाठवावा . त्यांनतर ते हॉस्पिटलला ऑथरायझेशन लेटर पाठवतील .
- काही हॉस्पिटल १५ ते २० टक्के डिपॉझिट भरण्यास सांगण्याची शक्यता असते . विमा योजनेत समाविष्ट नसलेले खर्च वळते करून घेऊन डिपॉझिट नंतर परत दिले जाते .
- डिस्चार्ज घेत असताना प्रिस्क्रिप्शन , बिले व डिस्चार्ज कार्डाची व अन्य कागदपत्रांची फोटोकॉपी घ्यावी .
हॉस्पिटलातील नियोजित भरती
- हॉस्पिटलात भरती करायचे आधीच ठरले असल्यास डॉक्टरांशी बोलून याबाबत निर्णय झाल्यावर विमा कंपनी वा ' टीपीए ' ला तसे कळवावे .
- हॉस्पिटलात भरती करण्यासंबंधी विमा कंपनी वा ' टीपीए ' ला कळवल्यानंतर ' क्लेम इंटिमेशन नंबर ' नमूद करून घ्यावा .
- प्री - ऑथरायझेशन फॉर्म भरून त्यामध्ये आवश्यक उपचार आणि त्यासाठी प्रस्तावित खर्च नमूद करावा . हा अर्ज पॉलिसी डॉक्युमेंटसोबत दिला जातो . हा अर्ज डाऊनलोडही करून घेता येतो .
- तपशील तपासून घेतल्यावर विमा कंपनी वा ' टीपीए ' ' कॅशलेस ट्रीटमेंट ' साठी हॉस्पिटलला ऑथरायझेशन लेटर पाठवेल .
- डिस्चार्ज घेत असताना प्रिस्क्रिप्शन , बिले व डिस्चार्ज कार्डाची व अन्य कागदपत्रांची फोटोकॉपी घ्यावी . मूळ प्रती हॉस्पिटलकडून विमा कंपनी वा ' टीपीए ' ला परस्पर दिल्या जातील .
डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटलात भरती होण्यापूर्वीचे व झाल्यानंतरचे दावे स्वतंत्रपणे करावे लागतात .
....
हॉस्पिटलात भरती होण्यापूर्वीचे व झाल्यानंतरचे दावे
- हॉस्पिटलात भरती झाल्यानंतर पुढे उपचाराची आवश्यकता नसेल तर हे दावे हॉस्पिटलायझेशन क्लेमसोबत करता येतील .
- हॉस्पिटलायझेशनपूर्वी ३० दिवस आणि त्यांनतर ६० दिवस आलेल्या खर्चाची भरपाई विमा कंपन्या करतात .
- डॉमिसिलिअरी एक्सपेन्सेसमध्ये डिस्चार्जनंतर ६० दिवसांपर्यंत औषधे , डॉक्टरांची फी , चाचण्या , शुश्रुषा यांचा समावेश असतो .
- विम्याच्या दाव्यासाठीचा अर्ज भरून , सोबत बिलांची व पावत्यांची मूळ प्रत जोडून सर्व कागदपत्रे ' टीपीए ' किंवा विमा कंपनीला सादर करावीत .
- आपल्या संदर्भासाठी सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपी स्वत : जवळ ठेवून द्याव्यात .
.....
विम्याचा दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची प्रत
- टीपीए कार्ड
- टीपीए वा विमा कंपनीने दिलेला प्री - ऑथरायझेशन फॉर्म
- पेशंट व डॉक्टरांची सही असलेला क्लेम फॉर्म
- डिस्चार्ज कार्ड
- हॉस्पिटलात दाखल करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांचे पत्र
- औषधे व उपचारांसंदर्भातील सर्व प्रिस्क्रिप्शन
- मेडिकल बिले
- इनव्हॉइस नंबर , उपचार खर्चाचा तपशील , पेेमेंट केल्याचे पुरावे यासह हॉस्पिटलची बिले
- मेडिकल रिपोर्ट , एक्स - रे , ब्लट टेस्टचे रिपोर्ट ( डॉक्टरांची सही असलेले )
- हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- सोयीच्या दृष्टीने सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत .
...
दावे फेटाळले जाऊ नयेत म्हणून पाळायचे पथ्ये
- हॉस्पिटल विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहे की नाही ते तपासून घ्यावे
- एकापेक्षा अधिक हेल्थ कव्हर घेतली असल्यास विम्याच्या दाव्यामध्ये तसा उल्लेख करावा
- प्रत्येक बिलासोबत ( मेडिसिन , डायग्नॉस्टिक्स व सर्जरी ) प्रिस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे
- विमा योजनेत डे - केअरचा समावेश नसेल तर किमान २४ तास हॉस्पिटलात भरती झाल्यावरच दाव्यासाठी विचार केला जातो .
No comments:
Post a Comment