Saturday, September 3, 2011

एटीएम मशीन वापरताना..

एटीएम मशीन वापरताना..
बँकांची ऑटोमेटेड टेलर मशिन्स अर्थात एटीएमचा वापर सहज आणि योग्य पद्धतीने करता येण्यासाठी गेल्या काही महिन्यांत नवे नियम जारी करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवहारांत लक्षणीय बदल झाला असून, ऑनलाईन पेमेंट, मॉलमधून किंवा दुकानांतून खरेदी करताना डेबिट अथवा क्रेडिट कार्डांद्वारे रकमा चुकत्या करणे किंवा एटीएममधून रक्कम काढणे आदींचा त्यात समावेश आहे. एटीएमचा वापर वाढावा यासाठी रिझर्व्ह बँक प्रोत्साहन देत असून, नेहमी करण्यात येणारे व्यवहार हे अधिक सोपे झाले आहेत.
■ एटीएम हे केवळ पैसे काढण्याचे मशीन राहिले नसून, त्यामुळे त्याचा अन्य कारणांसाठी वापरदेखील वाढला आहे.
■ एटीएम वापराच्या नियमांत बदल झाल्यानंतर थर्ड पार्टी एटीएम वापरण्याच्या प्रमाणात चौपट वाढझाली आहे.
मोफत र्मयादित व्यवहार
■ थर्ड पार्टी एटीएम वापराबाबत रिझर्व्ह बँकेने नवे नियम जारी केले आहेत.
■ एक जुलैपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार दुसर्‍या बँकांच्या एटीएम मार्फत केवळ पाचच व्यवहार मोफत करता येणार असून यात वित्तीय व्यवहारांव्यतिरिक्तच्या व्यवहारांचा समावेश आहे.
■ यापूर्वी बिगरवित्तीय व्यवहारांवर कोणतीही र्मयादा नव्हती.
■ आता अशा प्रकारच्या व्यवहारांवर शुल्क लागू शकते.
■ ज्या ग्राहकांचा सेव्हिंग अकाऊंटचा तिमाही बॅलन्स सरासरी १0 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा ग्राहकांसाठी थर्ड पार्टी एटीएमचे सर्व व्यवहार मोफत आहेत.
■ डेबिट किंवा एटीएम कार्ड चोरीला गेल्यास त्याचा गैरवापर होऊन मोठे नुकसान होऊ नये यासाठी १ जुलैपासून ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा नियम नियम जारी करण्यात आला आहे.
■ एटीएम, ऑनलाइन किंवा खरेदीसाठी कार्डामार्फत व्यवहार झाल्यास ग्राहकांना एसएमएसमार्फत याची माहिती देण्याची सूचना सर्व बँकांना करण्यात आली आहे.
■ पाच हजारांचा व्यवहार झाल्यावर बँका एसएमएस पाठवित होत्या.
■ ही सुविधा सर्व व्यवहारांसाठी लागू झाली असल्याने याचा फायदा ग्राहकांना होणारआहे.
■ कार्ड चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्याचे लक्षात न आल्यास या सुविधेमुळे अपडेट माहिती मिळेल
नुकसानभरपाई
कशी मिळेल ?
■ एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाचा वापर केल्यावर पैसे मशिनमधून बाहेर न येताच अकाऊंटला डेबिट पडल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
■ मात्र, अशा प्रकारच्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित कार्डधारकास बँकेचे हेलपाटे मारण्याच्या घटना घडल्या आहेत.
■ त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक पाऊल उचलले आहे.
■ कामाच्या सात दिवसांत झालेली चूक दुरुस्त करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने बँकांना केलीआहे.
■ मात्र, या कालावधीत ही चूक दुरुस्त न झाल्यास संबंधित कार्डधारकास दिवसाला १00 रुपये नुकसान भरपाई द्याली लागणार आहे.
■ नुकसान भरपाईसाठी पात्र होण्यासाठी चुकीचा व्यवहार झाल्यापासून तीस दिवसांच्या आत बँकेकडे तक्रार दाखल करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment