वेडिंग इन्शुरन्समध्ये
वैयक्तिक अपघात,
लग्न रद्द होणे वा पुढे ढकलणे,
लग्नाच्या ठिकाणी मालमत्तेचे झालेले नुकसान
यांचा समावेश असतो.
वैयक्तिक अपघात,
लग्न रद्द होणे वा पुढे ढकलणे,
लग्नाच्या ठिकाणी मालमत्तेचे झालेले नुकसान
यांचा समावेश असतो.
*Retirement Planning *Child Education Plan *Daughter's Marriage Fund *Estate Creation *Mobile:9322066623
चेकच्या बाबतीत काय काळजी घ्यावी ?
या गोष्टीत लक्षात ठेवा
|
पोस्ट म्हणजे सर्वसामान्यांचे गुंतवणुकीचे हक्काचे व्यासपीठ. आता हे पोस्ट खातेही कात टाकणार असून, पोस्टाची बँक होणार आहे. अर्थात पोस्टाचे प्रत्यक्ष बँकिंग रूप अवतरायला आणखी किमान २ वर्षे लागतील. पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या अल्प बचत योजना भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. नेमक्या कोणत्या योजना पोस्टातर्फे राबविण्यात येतात, त्याबाबत काही टिप्स.. ■ पोस्ट खात्याने केवळ टपाल साहित्याच्या विक्रीपुरतेच आपले क्षेत्र र्मयादित न ठेवता बँकेसारखी सेवा द्यावी आणि हे खाते व्यवसायाभिमुख बनवावे, अशी ब्रिटिशांची योजना होती. ■ साधा, सोपा फॉर्म, स्थानिक पातळीवरच सर्व व्यवहार, नामांकनाची सोय, अशा सोयी-सुविधांमुळे अल्प बचतीच्या योजना स्वत:चे वेगळे स्थान राखून आहेत. ■ या योजनांसाठी सरकारने अधिकृत अल्प बचत एजंट नेमले आहेत. ■ बचत बँक खात्याबरोबरच मासिक प्राप्ती योजना (एम.आय.एस.), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एन.एस.सी.), किसान विकास पत्र (के.व्ही.पी.), आवर्त ठेव (आर.डी.), मुदत ठेव योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पी.पी.एफ.), वरिष्ठ नागरिक बचत योजना (एस.सी.एस.एस.) यांचा प्रामुख्याने अल्प बचत योजनांत समावेश होतो. ■ मासिक प्राप्ती योजना (एम.आय.एस.) : एकरकमी पैसे गुंतवून दरमहा व्याजाच्या पाने उत्पन्न मिळविण्यासाठी ही योजना आहे. विशेषत: स्वेच्छानिवृत्ती किंवा निवृत्ती घेणार्या व्यक्तींच्या दृष्टीने ही योजना फायद्याची आहे. ■ ठेवीची किमान रक्कम दीड हजार असून, त्यानंतर दीड हजाराच्या पटीत रक्कम गुंतवणे व्याजाच्या दृष्टीने सोईचे पडते. एका (सिंगल) नावावर कमाल साडेचार लाख रुपये, तर दोघांच्या (संयुक्त) नावावर नऊ लाख रुपये ठेवता येतात. आठ टक्के व्याज आहे. ■ व्याज दरमहा रोख स्वरूपात मिळत असल्याने गुंतवणूकदारांची सोय होते. ■ ज्यांना दरमहा व्याज काढून घ्यायचे नसेल, त्यांना त्याच पोस्टात बचत बँक (सेव्हिंग) खाते उघडून, त्यात या योजनेचे व्याज परस्पर जमा करून घेता येते. ■ मुदतीअंती मिळणारा बोनस आणि दरमहा मिळणारे व्याज लक्षात घेता या योजनेवरील व्याजदर नऊ टक्क्यांपर्यंत जातो. विशेष म्हणजे यातून मिळणार्या व्याजातून करकपात (टी.डी.एस.) केली जात नाही. ■ मुदतीपूर्वीही पैसे मिळण्याची सोय यात ठेवण्यात आलेली आहे, पण पूर्ण सहा वर्षे पैसे ठेवले, तरच पाच टक्के बोनस मिळतो. |
|
| ||||||
कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा आपली आर्थिक ओळख म्हणून पॅनकार्ड ही आता एक अत्यावश्यक बाब झाली आहे. मुख्य म्हणजे, पॅनकार्डसाठी वयाची अट नसल्याने ते मायनर मुलाचे अथवा मुलीचे पॅनकार्ड काढणेही शक्य आहे. पॅनकार्ड काढण्याची सुविधा आता सर्वत्र उपलब्धझाल्याने ते काढलेले नसल्यास काढणे फायद्याचे आहे. विशेष म्हणजे, अर्ज केल्यापासून केवळ १५ दिवसांत स्पीड पोस्टाने पॅनकार्ड घरपोच येते. पॅनकार्ड कसे काढावे, कुठे काढावे याबाबत या काही टिप्स.. ■ सरकारच्या आयकर विभागाने प्रत्येकाला दिलेले हे एकमेव ओळखपत्र आहे. ■ प्रत्येकाचा पॅन क्रमांक वेगवेगळा असतो. ■ एका क्रमांकाचे दोन पॅन असणार नाहीत. ■ या कार्डावर सुरुवातीला एक नंबर असतो. तोच 'पॅन नंबर!' ■ त्याखाली कार्डधारकाचे संपूर्ण नाव असते. ■ त्याखाली वडिलांचे संपूर्ण नाव असते आणि कार्डधारकाची जन्मतारीख नमूद केलेली असते. ■ कार्डधारकाचे छायाचित्र आणि स्वाक्षरी असते. ■ पॅनकार्ड आयकर आयुक्त यांच्या सहीने देण्यात आलेले असते. ■ हे कार्ड म्हणजे त्या व्यक्तीची खात्रीची ओळख आहे. ■ हे कार्ड कुठेही ओळख म्हणून दाखवता येते आणि ही ओळख स्वीकारार्ह असते. पॅनसाठी कोठे अर्ज करावा? पॅनसंबंधी सेवा अधिक सुधारण्यासाठी प्राप्तिकर खात्याने यूटीआय इन्व्हेस्टर सर्व्हिसेस लि. (यूटीआयआयएसएल) यांना जेथे प्राप्तिकर खात्याचे कार्यालय आहे, अशा सर्व शहरांमध्ये आयटी पॅन सेवा केंद्रे उभारण्यास आणि व्यवस्थापित करण्यास तसेच नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) यांना पॅन देण्यास अधिकृत मान्यता दिलेली आहे. पॅनसाठी कसा अर्ज करावा? पॅनसाठी अर्ज केवळ अर्ज '४९ अ'मध्येच करता येतो. हा पॅन अर्ज प्राप्तिकर खात्याच्या किंवा यूटीआयआयएसएलच्या किंवा एनएसडीएलच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतो, किंवा त्याची छायाप्रतही वापरता येते. तुम्ही एका शहरातून दुसर्या शहरात राहण्यास गेलात किंवा तुमची बदली झाली तर तुम्हाला पॅनसाठी अर्ज करावा लागेल का? परमनंट अकाउंट नंबर (पॅन) त्याच्या नावाप्रमाणेच कायमस्वरूपी क्रमांक असतो आणि तो पॅनधारकाच्या आयुष्यभरात बदलत नाही. पत्ता किंवा शहर बदलल्याने मूल्यांकन अधिकारी कदाचित बदलेल. म्हणूनच, जवळच्या आयटी पॅन सेवा केंद्र किंवा टिन सेवा केंद्राला कळवावे लागेल. जेणेकरून प्राप्तिकर खात्याच्या पॅन डाटाबेसमध्ये आवश्यक ते बदल करता येतील. प्राप्तिकर खात्याने मला पॅनकार्ड जारी केलेले आहे, मी नवीन न फाटणारे पॅनकार्ड मिळवू शकतो का? नवीन न फाटणारे पॅनकार्ड मिळविण्यासाठी, नव्या पॅनकार्डासाठी आणि / किंवा पॅनच्या माहितीतील बदलांसाठी विनंतीसाठी अर्ज सादर करावा लागेल. ज्यामध्ये सध्याच्या पॅनचा उल्लेख करावा लागेल आणि जुने पॅनकार्ड परत करावे लागेल. ६0 रुपये अधिक लागू होणारा सेवाकर भरावे लागतील. पॅनसाठी अर्ज इंटरनेटद्वारे करता येतो का? होय. नवीन पॅन मिळविण्यासाठी इंटरनेटद्वारे अर्ज करता येतो. शिवाय पॅनच्या माहितीमध्ये बदल किंवा सुधार करण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पॅनसाठी नवे पॅनकार्ड मिळविण्यासाठी देखील इंटरनेटद्वारे विनंती करता येते. तत्काळ पॅन कसा मिळवावा? जर पॅन मिळविण्यासाठी इंटरनेटद्वारे अर्ज केलेला असेल आणि शुल्क नामांकित क्रेडिट कार्डद्वारे भरले असेल, तर पॅन प्राधान्यक्रमाने दिला जातो आणि ईमेलद्वारे कळवला जातो. |
■ क्रिटिकल इलनेस रायडर या सुरक्षिततेसाठी किंवा बचतीसाठी असलेल्या प्लॅनसोबत मिळणार्या रायडरमुळे तुम्हाला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले आणि त्यानंतर तुम्ही जिवंत राहिलात तर या रायडरखाली निवडलेल्या विमा रकमेइतकी राशी दिली जाते. ■ तुमची मूळ पॉलिसी कोणत्याही बदलाशिवाय पुढे चालू राहते. ■ हा रायडर वाढीव फायद्याच्या स्वरूपात किंवा जलद फायद्याच्या स्वरूपात असू शकतो. ■ जर रायडर जलद फायद्याच्या स्वरूपात असेल तर मूळयोजनेखालील फायदा त्वरेने म्हणजे गंभीर आजाराचे निदान झाल्यावर लगेच दिला जातो आणि मूळ योजनासुद्धा संपुष्टात येते. ■ याउलट रायडर वाढीव फायद्याच्या स्वरूपात असेल तर रायडर खालील विम्याची रक्कम निदान झाल्यावर देण्यात येते. आणि मूळ योजना पुढे चालू राहते. ■ क्रिटिकल इलनेस फायदा हा विमा योजनेचा अंगभूत भागही असू शकतो. ■ अपघाती मृत्यू फायदा या रायडरमध्ये जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर निवडलेली विम्याची रक्कम दिली जाते. ■ ही रक्कम मूळ योजनेखाली मिळणार्या विमा रकमेच्या अतिरिक्त असते. ■ या फायद्याच्या वाटपानंतर पॉलिसी करार संपुष्टात येतो. ■ पूर्ण व कायम अपंगत्व, प्रीमियम भरण्यापासून सूट आणि वाढीव अवधी फायदा या रायडर्समुळे जर विमाधारकाला अपंगत्व येऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या क्षमतेत कमालीची बाधा आली तर त्याच्या कुटुंबाला अधिक आर्थिक मदत मिळते. ■ प्रीमियम भरण्यापासून सूट या रायडरमध्ये विमाधारक जर अपंगत्वामुळे कोणताही व्यवसाय करण्यास असर्मथ ठरला तर मूळ प्रीमियम भरण्यापासून सूट मिळते. ■ पूर्ण व कायम अपंगत्व रायडरमध्ये जर विमाधारकास दुर्दैवाने पूर्ण व कायम अपंगत्व आले तर विमा रकमेचा काही भाग दरवर्षी १0 टक्के याप्रमाणे ठरावीक कालावधीसाठी योजनेस दिलेल्या शर्तीनुसार दिला जातो. ■ पूर्ण व कायम आणि अंशत: अपंगत्व फायदा हे रायडर्स ग्रूप अवधी विमा योजनांतर्गतसुद्धा दिले जातात. ■ वाढीव अवधी फायदा रायडरमध्ये रायडरच्या अवधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास एक विमा रक्कम अधिक दिली जाते. ■ हा फायदा मूळ फायद्यांच्या अतिरिक्त आहे, हा रायडर बहुतांश वेळा एन्डोमेंट आणि मनी बॅक या योजनांबरोबर जोडलेला असतो. आयुर्विमा योजनेबरोबर उपलब्ध असलेल्या रायडर्समुळे गरजांप्रमाणे व आवश्यकतेनुसार विमा प्लॅन बनविता येतो. यामुळे आपला प्लॅनही अधिक आकर्षक होऊ शकतो. रायडरसाठी द्यावा लागणारा अधिकचा प्रीमियम हा तुलनेने मूळ प्लॅनपेक्षा कमी असतो. रायडर स्वतंत्रपणे घेता येत नाहीत, तर मूळ प्लॅनबरोबर मिळणारे पर्याय निवडून अधिक फायद्याच्या स्वरूपात घेता येतात. |
■ म्युच्युअल फंडामध्ये विम्याचे संरक्षण मिळत नाही. ■ युलिपमध्ये विम्याचे संरक्षण मिळते. ■ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लिक्विड, डेट, बॅलन्स व ग्रोथ अशा चार स्वरूपाच्या फंडांत होते. ■ गुंतवणूकदाराला त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे फंडाची निवड करता येते. ■ युलिपमधील गुंतवणूकसुद्धा वरीलप्रमाणे चार फंडांत करण्यात येते. तसेच गुंतवणूक करताना फंड निवडण्याचे स्वातंत्र्य असते. ■ एका म्युच्युअल फंडाची योजना ही एकाच फंडाशी निगडीत असते. ■ युलिपमध्ये एकाच योजनेमध्ये चारही फंड उपलब्ध असतात. ■ त्यामुळे गुंतवणूकदाराला निरनिराळ्य़ा फंडांत पैसे गुंतविण्याची मुभा असते. ■ एका म्युच्युअल फंडातून आपले पैसे दुसर्या फंडात वळवायचे असल्यास त्या फंडातून बाहेर पडावे लागते व दुसर्या फंडाची योजना स्वीकारावी लागते. ■ ही पद्धत काहीशी खर्चिक असू शकते. ■ त्यासाठी एक्झिट लोड भरावा लागू शकतो. ■ युलिपमध्ये चारही फंड एकाच योजनेमध्ये उपलब्ध असल्यामुळे एका फंडातून दुसर्या फंडात पैसे सहज हस्तांतरित करता येतात. ■ याला स्वीच असे म्हणतात. ■ वर्षातून चार वेळा हे पैसे मोफत हस्तांतरित करता येतात. ■ म्युच्युअल फंडाची एसआयपी योजना युलिपमध्ये सुद्धा उपलब्ध असते. ■ म्युच्युअल फंडात ऑटोमॅटिक ट्रन्स्फर प्लॅनची योजना उपलब्ध नाही. ■ युलिपमध्ये ही योजना उपलब्ध आहे. ■ जे लोक एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. डेट फंडामध्ये गुंतवणूक करून दर महिन्याला ठराविक पद्धतीने पैसे ग्रोथ फंडात हस्तांतरित करता येतात. ■ यात एसआयपीसारखा फायदा मिळतो. ■ म्युच्युअल फंडामध्ये लाभांश व बोनस मिळण्याची सुविधा असते. ■ नवीन फंड असल्यास तीन वर्षे गुंतवणूक अनिवार्य असू शकते. ■ जुन्या खुल्या मुदतीच्या फंडांमध्ये केव्हाही पैसे काढण्याची मुभा असते. ■ युलिपमध्ये तीन किंवा पाच वर्षे गुंतवणूक अनिवार्य असते. ■ त्यानंतर गरजेप्रमाणे पैसे काढण्याची सोय उपलब्ध असते. ■ काही विमा कंपन्या ठराविक काळाने बोनस युनिट देतात. ■ बंद मुदतीच्या म्युच्युअल फंड योजनेत नंतर जास्त पैसे भरण्याची सोय उपलब्ध नसते. ■ युलिपमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ■ सर्वसाधारण म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर करसवलतीचा फायदा मिळत नाही. ■ म्युच्युअल फंडामध्ये मिळणार्या परताव्यावर चक्रवाढीचा संपूर्ण फायदा मिळत नाही. ■ हा फायदा युलिपमध्ये मिळतो. ■ म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. ■ म्युच्युअल फंडामध्ये प्रथम शुल्क बरेच कमी असते किंवा थेट गुंतवणूक केल्यास हे शुल्क लागत नाही. अनेक वेळा म्युच्युअल फंडाकडे वळताना गुंतवणूकतज्ज्ञ युलिपमध्येही गुंतवणुकीचा सल्ला देतात. परंतु गुंतवणुकीतून आपल्याला किती परतावा हवा आहे, गुंतवणुकीमागचा हेतू काय आहे याचा बारकाईने विचार करून मगच गुंतवणूक करणे इष्ट ठरते. म्युच्युअल फंड आणि युलिप या दोन्ही योजनांचे वरकरणी स्वरूप एकसारखेच आहे; पण तरीही त्या दोन्ही योजना वेगळ्य़ा आहेत. |